Breaking News

कामोठ्यातील रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे रविवारी (दि. 9) बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन ‘रयत’चे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलचा कॅम्पस हा संस्थेचा सर्वांत उत्कृष्ट कॅम्पस आणि त्याचा कळस बहुउद्देशीय हॉल आहे, अशा शब्दांत कौतुक केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ‘रयत’चे ऑर्गनायजर डॉ. अनिल पाटील, स्कूल कमिटी चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव विकास देशमुख, सहसचिव डॉ. ज्ञानदेव म्हस्के, बंडू पवार, ऑडिटर डॉ. शिवलिंग मेणकुदळे, माजी सहसचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, डॉ. गणेश ठाकूर, जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, वाय.टी.देशमुख, गणेश भगत, राजेंद्र साळुंखे, प्रमोद कोळी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डी.बी.पाटील, जोत्स्ना ठाकूर, रवींद्र भोईर, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, भाजप महिला मोर्चाच्या आशा भगत यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्था ही सर्वांना न्याय देण्याचे काम करत असल्याचे सांगत चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या कार्याचे कौतुक केले.
ऑर्गनायजर डॉ. अनिल पाटील यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर सोबत असतील, तर कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि त्यांचीच परंपरा आमदार प्रशांत ठाकूर हे पुढे नेत आहेत, असे गौरवोद्गार काढले.
स्कूल कमिटीचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शाळेतील दर्जेदार शिक्षणामुळे कामोठे परिसरात सर्वोकृष्ट शाळा म्हणून रामशेठ ठाकूर शाळेची गणना होत आहे, असे प्रतिपादन केले.

‘रयत’चे चेअरमन चंद्रकांत दळवी हे हिरा -लोकनेते रामशेठ ठाकूर


रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी यांची निवड झाली आहे. त्याबद्दल कामोठे येथील ‘रयत’च्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘रयत’चे नवनिर्वाचित चेअरमन चंद्रकांत दळवी हे एक हिरा आहेत, असे गौरवोेद्गार काढले.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे हे ओळखून सामान्य जनतेच्या शिक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या चेअरमनपदी भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले चंद्रकांत दळवी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सत्कार समारंभास संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी.देशमुख यांच्यासह ‘रयत’चे पदादिकारी, रयतसेवक आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply