पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपच्या दिवंगत नगरसेविका मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून कीर्तन आणि पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी भेट सदिच्छा देत विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविले.
या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पुणे जि. प.च्या सदस्य तथा इसमा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्ष अंकिता पाटील उपस्थित होत्या, तसेच पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशीला घरत, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजेश्री वावेकर, रूचिता लोंढे यांच्यासह पदाधिकारी आणि महिलावर्ग उपस्थित होता.
स्व. मुग्धा लोंढे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, तसेच जागतिक महिला दिनानिमित्त कीर्तन आणि पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भाजप प्रभाग क्रमांक 19च्या वतीने घेण्यात आलेली पाककला स्पर्धा विरूपाक्ष मंगल कार्यालयात झाली, तर विरूपाक्ष मंदिरात कीर्तन स्पर्धा झाली. दोन्ही स्पर्धांचे बक्षीस वितरण विरूपाक्ष मंगल कार्यालयात झाले.
कीर्तन स्पर्धेत गौरी खांडेकर यांनी प्रथम, ज्योत्स्ना गाडगीळ यांनी द्वितीय आणि सायली मुळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. सुखदा मुळे यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. पाककलेतील केक स्पर्धेत श्रद्धा म्हात्रे प्रथम, मृणालिनी गुडी द्वितीय व नूतन दातार तृतीय आल्या. भात बनविणे स्पर्धेत गौरी राजे प्रथम, उज्ज्वला पटवर्धन द्वितीय, नीलिमा गडकरी तृतीय व गौरी कोरळकर यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले, तर पराठे स्पर्धेत रजनी देशमाने यांनी प्रथम, शिल्पा बापट द्वितीय व तृप्ती पुणतांबेकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
Check Also
खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …