Breaking News

पनवेलकरांना मुसळधार पावसाने झोडपले

पनवेल : वार्ताहर
गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने पनवेलकरांना चांगलेच झोडपले आहे. या पावसामुळे नदी आणि नाले भरून वाहत असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने गाढी नदीला पूर आला आहे. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पनवेल शहरातील मच्छिमार्केट जवळील वडघर पुल परिसरात राहणार्‍या कोळी बांधवांसह इतर बांधवाना त्याच प्रमाणे खाडी नजीक राहणार्‍या रहिवाश्याना पनवेल महानगरपालिका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला असून पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेतच स्थानकात गाड्या येण्यास विलंब होत असल्याने ही गर्दी झाली.
मुसळधार पाऊस पडत असल्याने तांत्रिक कारणामुळे उपनगरीय रेल्वेसेवा थांबविली असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्ववभूमीवर पनवेल महानगरपालिका, अग्निशामक दल, पोलीस प्रशासन, तहसिदार कार्यालय कोणतीही परिस्थिती हातळण्यासाठी सज्ज आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply