Breaking News

करंजाडे येथे विविध विकासकामे

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : प्रतिनिधी
करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पक्ष करंजाडे अंतर्गत विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 23) करंजाडे येथे झाला. या विकासकामांचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले.
करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पक्ष करंजाडे अंतर्गत आयोजित विविध विकासकामांचा शुभारंभांमध्ये करंजाडे ग्रामपंचायत अंतर्गत अ‍ॅब्युलन्स सुविधा, ओपन जीम सुविधा, शिवमंदीराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण, शौचालय सुविधा, गावदेवी आदीवासीवाडी येथे नळ-पाणी कनेक्शन आणि बीज कनेक्शन सुविधा यांसारख्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या वेळी आमदार महेश बालदी यांनी करंजाडेकरांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, करंजाडेमधील रस्ते लवकरच गुळगुळीत व चांगले होतील. पाण्याचा प्रश्न ही सुटेल. तुमचे प्रश्न सोडवण्याची आमदार प्रशांत ठाकूर आणि माझी जबाबदारी आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप तर्फे तुम्हाला दिलेली आश्वासन पूर्ण करण्याची आमची जवाबदारी आहे. त्यासाठी सरपंच मंगेश शेलार पाठपुरावा करीत आहेत. तांत्रिक अडचणी दूर करण्याची जबाबदारी संबंधित पूर्ण करत नसतील तर त्याचा जाब त्यांना विचारून तोपर्यंत टँकर देण्यास त्यांना भाग पाडले जाईल. रस्त्याचे टेंडर निघाले आहे. पाऊस थांबल्यावर ते काम सुरू होईल.
विकासकामांचा शुभारंभांवेळी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, शहर अध्यक्ष मिरेन्द्र शहारे, माजी उपसरपंच गजानन पाटील, माजी सरपंच बळीराम म्हात्रे, राकेश गायकवाड, समीर केणी, वैशाली जगदाळे, विक्रम मोरे, विजय आंग्रे, बाळु फडके, बळीराम भोईर, सुनील भोईर, नाथा भाई भारवाड, करंजाडे ग्रामपंचायतीच्या सदस्य सुरज शेलाल, देवकु वाघे, बिपीन गायकवाड, नंदकुमार भोईर, भाजप कार्यकर्ता निलेश दराडे, प्रिती शहारे, अनिता भोईर, शिल्पा नागे, अतीश साबळे, प्रिया फडके, कल्पना गायकर, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply