शेकाप, उद्धव ठाकरे गटाला खिंडार
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील सांगुर्ली ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे. माजी सरपंच, सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मुंबईतील निवासस्थानी बुधवारी (दि. 2) झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, केळवणे जि.प. विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पळस्पे पं.स.विभागीय अध्यक्ष विजय गवंडी, सांगुली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्तात्रेय हातमोडे, सदस्य शरद वांगिलकर, संतोष पारधी, माजी सदस्य विष्णू ठोकळ, जगदीश पाटील, युवा कार्यकर्ते निलेश हातमोडे, नितीन चोरघे, अनिल हातमोडे, विशाल गायकर, अमित पाटील, राजेंद्र हातमोडे, वसंत हातमोडे, लक्ष्मण गायकर, निलेश वांगिलकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी सांगुर्ली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य महादेव बळीराम चोरघे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मिनल महादेव चोरघे, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य मिलिंद बळीराम पाटील, माजी सदस्य भास्कर दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबतच वसंत बामा उदरे, नामदेव उदरे, संतोष वाजेकर, संतोष जाधव, राजेंद्र चोरघे, सौरभ उदरे, निलेश उदरे, रमेश चोरघे, राकेश गायकर, शुभम उदरे, अक्षय कोल्हटकर, संदीप जाधव, भावना चोरघे, अथर्व जाधव, अक्षय शंकर गायकर, दिपेश उदरे, मृण्मय चोरघे, लक्ष्मण (लकी) कोळी, संदीप जाधव, जितेंद्र गायकर, योगेश गायकर, सूरज घरत, कल्पेश गायकर यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले.