पनवेल : रामप्रहर वृत्त
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडच्या संयुक्त विद्यमाने रामशेठ ठाकूर बॅडमिंटन ट्रॉफी 2023 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी रामशेठ ठाकूर इंटनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे येणार्या काळात खेळाडूंसाठी करियर घडवण्याचे सेंटर बनेल, असा विश्वास यांनी व्यक्त केला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 6) झाला.
या वेळी भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संदीप नाईक म्हणाले की, सामान्यपणे वागणे, परंतु मनामध्ये समाजासाठी खूप काहीतरी विचार करणे, समाजाला सोबत घेऊन जाण्याची धारणा, बदलती परिस्थिती आत्मासात करणे आणि पुन्हा भविष्याचे वेध घेत असताना सर्वांना सामावून जाऊन मोठी झेप घेणे अशी उत्तुंग व्यक्तिमत्त्वं जी पदापेक्षा मोठी असतात असेच एक व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत. त्यांच्यासोबत संवाद आणि चर्चा करण्याची संधी आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांनी दिल्याबद्दल त्यांचे आभार आणि सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
पारितोषिक वितरण समारंभास भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त श्रीकांत वाड, रामशेठ ठाकूर इंटरनॅशन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे एमडी तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संदीप देशमुख, एमबीए कार्यकारी समिती सदस्य प्रसाद गोखले, माजी पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचातीचे उसपरपचं विजय घरत, सदस्या योगीता भगत, भाजप नेते किशोर पाटील, रायगड बॅडमिंटन ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष रवींद्र भगत, सचिव डेव्हिड अल्वारीस, श्याम फुंडे, प्रशांत मुखर्जी, मिलिंद घरत, अमोघ ठाकूर, अपूर्व ठाकूर, आदेश ठाकूर, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
स्पर्धा 11, 13, 15 आणि 17 वर्षाखालील मुले व मुली तसेच महिला, पुरुष खुल्या गटात झाली. विजेत्यांना एकूण चार लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली. प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकास सन्मानचिन्ह आणि पारितोषिक रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …