Breaking News

निलिमा चव्हाणला न्याय देण्यासाठी नाभिक समाज एकवटला

रोहा, मुरूडमधील समाजबांधवांचे कारवाईसाठी निवेदन

धाटाव, रोहे, मुरूड : प्रतिनिधी
चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील रहिवासी 24 वर्षीय तरुणी निलिमा चव्हाण हिचा मृतदेह दाभोळ खाडीकिनारी आढळून आला. त्यामुळे संपूर्ण नाभिक समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी (दि. 7) रोहा व मुरूडमधील नाभिक समाजबांधवांतर्फे आरोपीला तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत रोहा व मुरूड तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
रोहा तालुका तरुण संघांच्या वतीने राम मारुती चौक येथे मृत निलिमा चव्हाण हिला श्रद्धांजली अर्पण करून रोहा नगरपालिका येथून तहसीलदार कार्यालयापर्यंत असंख्य समाज बांधवांनी मुक मोर्चा काढला व या घटनेचा निषेध केला.
माता भगिनीवर अत्याचार, खुन अशा घटना घडत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वारंवार घटना घडु नये यासाठी या विधीमंडळात आरोपी विरोधात कठोर कायदे करावे व त्यांची अंमलबजावणी करावी, तसेच नाभिक समाजातील निलिमा चव्हाण या भगिनींला न्याय मिळवून द्यावा आणि आरोपीस पकडून त्याच्यावर कठोरपणे कारवाई करावी. जोपर्यत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहिल असे नाभिक समाजातर्फे सांगण्यात आले. रोह्यात नाभिक तरुण तालुकाध्यक्ष प्रविण पवार, उपाध्यक्ष दिलीप मोहिते, यशवंत खराडे, सोपान मोहिते, बबन मोहिते, राजेश खराडे, मयुर दिवेकर, रोहा शहर नाभिक अध्यक्ष मंगेश रावकर, किशोर खंडागळे, केतन पवार, सदानंद सालुके, उत्तम सांलुखे, मगेश सकपाळ, मंगेश सकपाळ, शेखर सकपाळ, विनायक रावकर, राजेश खराडे, बळीराम काशिद, सचिन रावकर, प्रभाकर मोहिते, दिलीप शिंदे, निलिमा खराडे, सुवर्णा बुरुणकर, मानसी दिवेकर, सुरेखा पवार, रश्मी खराडे यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
त्याचप्रमाणे मुरूडमध्ये तालुका नाभिक समाज अध्यक्ष प्रकाश चव्हाण, शहर अध्यक्ष विश्वास चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष वृषाली चव्हाण, उपाध्यक्ष राजेश गायकवाड, श्रद्धा गायकवाड, ज्योती मोरे, प्राजक्ता चव्हाण, अर्पणा रावकर, प्रवीण रावकर, शरद चाफेकर, संदिप साळुंखे, अच्युत चव्हाण, अनुराधा चव्हाण, वैष्णवी कोलवणकर, शितल गायकवाड, अनिता कोलवणकर, महेश सांळुखे, प्रसन्न गायकवाड, रुपेश टक्के, सचिन रावकर, वसंत कोलवणकर, श्रद्धा चाफेकर, संध्या साळुंखे, भक्ती कोलवणकर, राजु कदम, मंगेश गायकवाड, विशाल कोलवणकर आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply