पनवेल ः वार्ताहर
पनवेल रेल्वेस्थानक मालधक्का परिसरात मंगळवारी (दि. 8) पहाटे चारच्या सुमारास एका 27 वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार व तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पनवेल शहरातील टिळक रोड, ओम बेकरीसमोर राहणार्या विकी चिंडालिया (वय 27) या तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार व तीक्ष्ण हत्याराने हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे, गुन्हे शाखा कक्ष 2चे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. या वेळी पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला आढळून आला तसेच त्याच्या महत्त्वाच्या वस्तू आजूबाजूला पडलेल्या दिसल्या.
विकी हा एवढ्या पहाटे या ठिकाणी का आला होता? त्याला कोणी बोलावले होते का? या दृष्टीने पनवेल शहर पोलीस तपास करीत आहेत.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper