Breaking News

सरकारी योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर

कर्जत : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचा लाभ महिलावर्गाने घ्यावा, असे आवाहन भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 10) केले. ते कर्जतमधील डिकसळ येथे आयोजित सोहळ्यात बोलत होते.
भाजप उमरोली जिल्हा परिषद विभागाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांचा सत्कार, तसेच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, भाजपच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सन्मान असा एकत्रित कार्यक्रम तालुका सरचिटणीस राजेश भगत व त्यांच्या पत्नी चिंचवली ग्रामपंचायतीच्या सदस्य सुप्रिया भगत यांनी डिकसळ येथील रोहित मंगल कार्यालयात आयोजित केला होता.
या सोहळ्यात आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह चिंचवली ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन पाटील, माणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच निकिता कराळे, नुकतीच ज्यांची वृद्ध कलाकार साहित्यिक पेन्शन योजना समितीवर नेमणूक झाली आहे ते काशिनाथ पार्टे यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे उमरोली जि.प. गटातील सामाजिक, आर्थिक, बचत गटात काम करणार्‍या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. उद्योजक महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले, तर बचत गटातील महिलांना साडीवाटप करण्यात आले.
या वेळी अविनाश कोळी, दीपक बेहेरे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. जाई किणी यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. राजेश भगत यांनी प्रास्ताविक व नम्रता कांदळगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
सोहळ्यास भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, चिटणीस रमेश मुंडे, तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, सरचिटणीस संजय कराळे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, सनी यादव, नगरसेवक बळवंत घुमरे, नितीन कांदळगावकर, रमेश कदम, सूर्यकांत गुप्ता, अभिषेक तिवारी, संदेश कराळे, दर्शन कांबळी, जयदास जाधव, केशव तरे, दीपक जगताप, हेमंत पाटील सूर्यकांत गुप्ता, स्नेहा गोगटे, अ‍ॅड. प्रिती तिवारी, शर्वरी कांबळे, सर्वेश गोगटे उपस्थित होते.

Check Also

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …

Leave a Reply