पनवेल : रामप्रहर वृत्त
शिक्षणामुळे आपला देश प्रगती करीत असून या शिक्षणामध्ये उच्च दर्जा प्राप्त करून देण्याकरिता सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल योगदान देईल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 11) इन्व्हेस्टीचर समारंभात केले. नेतृत्व, एकता, शिस्त, नैतिकता, निष्पक्षता आणि आपल्या पदाविषयी प्रामाणिकपण ठेवावा, असेही ते या वेळी म्हणाले.
‘रयत’च्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये इन्व्हेस्टीचर समारंभ आयोजित करण्यात आला होता. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे सचिव बी.एन.पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभास संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, अरुणशेठ भगत, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, संस्थेचे रायगड विभागाचे निरीक्षक आर.पी.ठाकूर, शहाजी फडतरे, सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर, स्कूल कमिटी सदस्य निलेश खारकर खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, मुक्ता खटावकर, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
विद्यालयात निवडून आलेले हेड बॉय, हेड गर्ल, क्रीडा प्रमुख विद्यार्थी तसेच सर्व हाऊस प्रमुख विद्यार्थ्यांनी या वेळी स्वतःची ओळख करून दिली. त्यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बॅच आणि सॅश प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …