Breaking News

बीसीसीआयमध्ये ‘दादा’पर्व, गांंगुलीने स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

क्रिकेट विश्वातील ‘दादा’ अशी ओळख असलेला सौरव गांगुली याने बुधवारी

(दि. 23) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विविध राज्य संघटनांनी मुंबईत एक अनौपचारिक बैठक घेतली होती. त्यात अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोघांच्या नावांची चर्चा होती, मात्र केवळ गांगुलीनेच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे अध्यक्षपदी गांगुली विराजमान होणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार त्याने बुधवारी पदभार स्वीकारला.

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ बुधवारी संपला. त्यामुळे लगेचच सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि त्याची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. गांगुलीसोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय याने बीसीसीआयच्या सचिवपदाचा आणि माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण यांनी कोषाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यांचीही निवड बिनविरोध झाली.

पदभार स्वीकारल्यानंतर आजी-माजी क्रिकेटपटूंनी गांगुलीचे अभिनंदन केले व त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

65 साल बाद..!

गांगुली हा बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारणारा भारताचा केवळ दुसरा माजी कर्णधार ठरला. महाराजकुमारला पहिल्यांदा हा बहुमान मिळाला होता. 1936 साली त्याने तीन कसोटी सामन्यांसाठी भारताचे नेतृत्व केले होते, तर 1954 साली त्याने बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर तब्बल 65 वर्षांनी हा योग जुळून आला.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply