Breaking News

माणगाव कार्यालयातील तोडफोडप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षासह पाच जणांना अटक

जामिनावर सुटका

माणगाव : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणार्‍या माणगाव येथील चेतक इंटरप्राइझेसच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षासह पाच कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे.
सनी कन्स्ट्रक्शन कंपनी अंतर्गत चेतक इंटरप्रायझेसकडून मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावमधील इंदापूर ते लाखपाले बायपासचे काम सुरू आहे. मनसेनेच्या कार्यकर्त्यांनी चेतक इंटरप्रायझेसच्या माणगाव गणेश नगर येथील कार्यालयात 16 ऑगस्ट रोजी तोडफोड केली होती.
याबाबत चेतक इंटरप्रायझेसचे सुरक्षा रक्षक रमेश शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माणगाव पोलिसांनी मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, कार्यकर्ते संजय बाळकृष्ण गायकवाड, चिमण सुखदरे, केतन गायकवाड, दीपक जाधव अशा पाच जणांना अटक केली. त्यांना शुक्रवारी माणगाव न्यायालयासमोर हजर केल्यावर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पोंदकुळे व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्री. गायकवाड करीत आहेत.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply