Sunday , September 24 2023

पोलीस असल्याचे सांगून तरुणीवर लैंगिक अत्याचार; पेणमधील घटना

पेण : प्रतिनिधी
पोलीस असल्याचे सांगून पेणमध्ये एका नराधमाने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 17 वर्षीय तरुणी ही सहकार्‍यासोबत ट्री हाऊसकडून पेणकडे येत असताना रिक्षाचालक प्रशांत पाटील याने मी पोलीस आहे असे धमकावून तरुणी व साक्षीदार यांना जबरदस्तीने आपल्या रिक्षात बसवले आणि त्यांचे मोबाईल काढून घेत त्यांना धामणी येथील एका बंद पडलेल्या कंपनीत नेऊन रिक्षा थांबविली. या वेळी रिक्षाचालक प्रशांतने त्यांना खाली उतरवून व दमदाटी करून तरुणीला बळजबरीने प्रेगन्सी टेस्ट करायला सांगितले. त्यास तिने नकार दिला असता प्रशांतने तरुणीचे कपडे काढून प्रेगन्सी टेस्ट करण्याची पट्टी तसेच बोट तिच्या गुप्तांगात घातले. नंतर आरोपीने आपल्या मोबाईलवरील अश्लील व्हिडीओ दाखवून पीडित तरुणी व सहकारी यांना तसे करण्यास सांगितले व न केल्यास मी करेन असा दम दिला.
याबाबत पेण पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 376, 363, 170, 505 बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012चे कलम 4,8,12 प्रमाणे तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी प्रशांत पाटील याला पोलिसांनी अटक केली असून तो मूळचा काळेश्री गावचा व सध्या रामवाडी येथे वास्तव्य करीत आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या नेतृत्वाखाली महिला सहाय्यक निरीक्षक एम. जे. घाडगे अधिक तपास करीत आहेत.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply