एक जण जखमी
पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरातून जाणार्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डापूलावरून एका चार चाकी वाहन खाली कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
पनवेल जवळील शिवशंभो नाका ते बस स्थानक जाणार्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डापूलावरून किया सेलटॉस (क्र एमएच 46 बीपी 1755) वाहन आज सकाळी एमसीसीएच सोसायटीमधील अंजली प्लाझा इमारतीजवळ खाली कोसळले. या घटनेत गाडीचे हि मोठे नुकसान झाले आहे. तर एक जण जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांचे तसेच वाहतूक शाखेच्या पथकाने तात्काळ घटना स्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली.
Check Also
बीसीटी विधी महाविद्यालयात पदवीदान सोहळा
मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई …