Breaking News

कराडे बुद्रुक येथील शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाची विचारसरणी, विकासकामांचा धडाका व आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीला प्रभावित होत कराडे बुद्रुक येथील शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये आपटा येथे झालेल्या कार्यक्रमात रविवारी (दि. 27) जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार महेश बालदी यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, आपटाचे सरपंच नजनिन पटेल, माजी सरपंच दत्ता पाटील, कराडे खूर्दचे माजी सरपंच विजय मुरकुटे, ताराचे उद्योगपती बाळूशेठ पाटील, भाजप नेते गणेश पाटील, साईचे माजी सरपंच विद्याधर मोकल, शिरढोणचे माजी उपसरपंच जगदीश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य असद पिटू, संतोष शिंगाडे, सामाजिक कार्यकतर्रे रत्नाकर घरत, कृष्णा वाघे, दत्ता भोईर, सुशील ठाकूर, धर्मेंद्र भोईर, विलास ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते
कराडे बुद्रुक येथील शेकापचे मंगेश आवळे, प्रतीक पाटील, निकेश मालुसरे, निसर्ग पाटील, मयूर मालुसरे, प्रलाद पवार, आकाश साळवी, सुरज अनिकेत वाघ, यश वाघ, स्वस्तिक भोजने, सुजल पेळणेकर, दर्शन गोडवाले, चेतन गोडवाले, कुणाल गोडवाले, रितेश बोंबले, विशाल शिर्के, शुभम साळवी, मयूर झिंगरे, कुणाल झिंगरे, समर उकेरे, शुभम साळवी, रोहित कुडाळने, सोहम झिंगरे, जयश शिर्के, दीपक शिर्के, प्रविण पाटील, नंदू महाडिक, शंकर वाघ, अंकित बेकवडे, शुभम उखारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Check Also

एक दिग्दर्शक, एक वर्ष, चार चित्रपट, सर्वच सुपर हिट; मनमोहन देसाईंची कम्माल…

दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या चित्रपटात इतकं आवडण्यासारखे काय असते? माहीत नाही. याचा अर्थ त्याबाबत अज्ञान आहे …

Leave a Reply