आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धेचा शानदार शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोशिश फाउंडेशनच्या वतीने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात सोमवारी कामोठ्याील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झाली. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास घडविणार्‍या या उपक्रमातील वर्ग अंतर्गत फेरी अतिशय उत्साही वातावरणात पार पडली.
या वेळी युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, समाजसेवक भाऊ भगत, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, प्राचार्य अविनाश कुलकर्णी, मनोहर शिंगाडे, विनोद खेडकर, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव, छबी कृष्ण क्षीरसागर, प्रवीण कोरडे, राहुल बुधे, किरण जाधव आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वक्तृत्वकौशल्य आणि नेतृत्वगुणांची जोपासना व्हावी या हेतूने पनवेल महानगरपालिका आणि कोशिश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धा 23 जून ते 31 जुलैपर्यंत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा दरवर्षी यशस्वीपणे राबवली जाते. या वर्षी
स्पर्धेचे तिसरे वर्ष असून 18 शाळांमधून सुमारे 14 हजार विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
स्पर्धा वर्ग अंतर्गत फेरी, शाळा अंतर्गत फेरी आणि शालेय अंतिमफेरी होणार असून निवडक 600 स्पर्धकांमधून अंतिम60 विजेते ठरणार आहेत. त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत सोमवारी या स्पर्धेच्या वर्ग अंतर्गत फेरीला सुरुवात झाली. यामध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रभावी भाषणे सादर करत आपली मते प्रभावीपणे मांडली. मुलांचे सादरीकरण, तयारी आणि आत्मविश्वास पाहून शिक्षक, पालक आणि परीक्षक भारावून गेले.
या उपक्रमामध्ये गेल्या वर्षी हजार विद्यार्थी सहभागी झाले होते, तर यावर्षी सुमारे हजार विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. या उपक्रमात पनवेल महानगरपालिका अंतर्गत शाळांचाही समावेश आहे. या स्पर्धेची पुढील फेरी म्हणजे शाळा अंतर्गत फेरी लवकरच घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक वर्गातील निवडक विद्यार्थी पुढे जातील. त्यानंतर अंतिम फेरीत सर्वोत्तम वक्ते निवडले जातील.

आमदार प्रशांत ठाकूर आणि कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांसाठी संवाद कौशल्य वाढवणार्‍या आणि आत्मविश्वास निर्माण करणार्‍या अशा उपक्रमाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आम्ही शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे मत व्यक्त करण्याचे मुक्त व्यासपीठ लाभले.
-स्वप्नाली म्हात्रे, प्राचार्य, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कामोठे

Check Also

Пинко казино: Азартные игры или развлечение?

Пинко казино: Азартные игры или развлечение? Вопрос о том, является ли Пинко казино азартной игрой …

Leave a Reply