Breaking News

निधीअभावी रस्त्याचे काम रखडले

 साळाव ते आगरदांडा राज्यमार्ग गेला खड्ड्यात

मुरूड : प्रतिनिधी

मुरुड हा पर्यटन तालुका आहे. मात्र राज्य शासनाकडून मंजूर झालेला निधी प्राप्त होत नसल्याने मुंबईला जोडणार्‍या साळाव ते आगरदांडा या मुख्य रस्त्याचे काम रखडले आहे. त्याचा त्रास स्थानिकांबरोबरच पर्यटकांनासुद्धा सहन करावा लागत आहे.

साळाव ते आगरदांडा या रस्त्यासाठी राज्यमार्ग  योजनेअंतर्गत सात कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी जेमतेम एक कोटी 75 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाकडून अदा करण्यात आला आहे. त्यातून साळाव ते बारशीवपर्यंच रस्ता तयार करण्यात आला. मात्र उर्वरित निधी न मिळाल्याने त्यापुढील बारशीव ते आगरदांडा रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे खड्ड्यात गेलेल्या या रस्त्यावरून लोकांना प्रवास करावा लागत आहे.

दरम्यान, प्रवाशांनी आंदोलन केल्यामुळे बारशीव ते आगरदांडा रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र त्यात मोठे खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिले जात आहे, छोटे खड्डे तसेच ठेवण्यात येत आहेत.

बारशीव ते आगरदांडा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यासाठी मंजूर झालेला उर्वरित निधी मिळावा, अशी मागणी करणारे पत्र शासनाकडे पाठवले आहे.

-राहुल मोरे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply