Breaking News

रोह्यातील जादूटोणा प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

आतापर्यंत एकूण नऊ आरोपी गजाआड

रोहे : प्रतिनिधी
तालुक्यातील धामणसई येथील जादूटोणा प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी मागोवा घेत बुलढाणा येथून अटक केली आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता, मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली.
धामणसई येथील एका खासगी शाळेत 12 ऑगस्ट रोजी जादूटोणा करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना ग्रामस्थांनी पर्दाफाश करून हा प्रयत्न उधळला होता. पैशांचा पाऊस पाडण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. ग्रामस्थांनी या आरोपींनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आरोपीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी मांत्रिक फरार झाला होता. या प्रकरणी आधी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी मांत्रिक गेल्या दीड महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्या मांत्रिकाचा तपास रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. रोहा पोलीस उपनिरीक्षक हिवरकर व त्यांच्या टिमने अखेर मंगळवारी (दि. 26) यातील मुख्य आरोपी मांत्रिक अमोल सोळंके (रा. निवाना, ता.संग्रामपुर जि. बुलढाणा) येथून अटक केली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर करीत आहेत.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply