Breaking News

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान : अलिबागमध्ये 2162 श्री सदस्यांचा सहभाग

अलिबाग ः प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सेवा पंधरवाडानिमित्ताने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी
(दि. 1) अलिबाग तालुक्यातील विविध गावांत 56 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले. श्री सदस्यांनी गावात जाणारे रस्ते, शाळा, मंदिर, स्मशानभूमी, बाजारपेठ, समुद्रकिनारा रस्ते चकाचक केले. या अभियानात 2162 श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये सामाजिक जनजागृती, सर्व स्वच्छता अभियान, आरोग्य जनजागृती, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, स्टेमसेल शिबिरे, वृक्ष लागवड व संवर्धन, गांडूळ खत प्रकल्प, जनजागृती, जलव्यवस्थापन, सामाजिक अनिष्ट परंपरा निर्मूलन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, साक्षरता अभियान, व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण, नोकरीविषयक मार्गदर्शन, पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत वनराई बंधारे, विहिरी, कूपनलिका, पुनर्जलभरण, शालेय शिक्षणासाठी शासकीय दाखले वाटप अभियान, नैसर्गिक आपत्ती मदत व्यवस्थापन, श्रवणयंत्र वाटप, दिव्यांग-मूकबधीर शाळा व्यवस्थापन, बालसंस्कार वर्ग, महिला स्वशक्तिकरण, सामाजिक कुप्रथा निर्मूलन आदी. विविध उपक्रम राबविले जातात.
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील अलिबाग, कुरूळ, रेवदंडा- चौल, थळ, पोयनाड-पेझारी, हाशीवरे, चोंढी-सोगांव, झिराड, सारळ-रेवस आदी विविध 56 ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यामध्ये एक लाख 11 हजार 617 चौ.मि. क्षेत्रात 105.80 किमी रस्ता व 11 किमी समुद्र किनार्‍यावर एकूण 65.210 टन ओला व सुक्या कचरा गोळा करण्यात येऊन ठिकठिकाणच्या डंपिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात 2162 श्रीसदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply