Breaking News

मिशन मोडवर काम करा -मंत्री रवींद्र चव्हाण

उत्तर रायगड जिल्हा भाजपची कार्यसमिती बैठक उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रत्येक राजकीय लढाई जिंकायची आहे आणि ती जिंकण्यासाठी ताकदीने उतरायचे आहे. विजय एवढा मोठा असला पाहिजे की विरोधकाला हिंमत होता कामा नाही, त्यासाठी मिशन मोडवर काम करा, अशी सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. 2) येथे केली.
उत्तर रायगड जिल्हा भाजपची कार्यसमिती बैठक मंत्री रवींद्र चव्हाण तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्ड येथे झाली. त्या वेळी मार्गदर्शन करताना ना. चव्हाण बोलत होते.
मंत्री चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की, कार्यकर्ता पक्षाचा कणा, तर बूथ कमिटी बलस्थान आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने राजकीय लढाई जिंकण्यासाठी सज्ज रहावे. काम करण्याच्या अनेक संधी आहेत, ज्या वेळी आपल्यातला कार्यकर्ता जिवंत राहतो त्या वेळी काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रत्येक मतदारसंघात भाजपला चांगले वातावरण आहे. मी प्रवासात पाहिले त्यानुसार कोकणात आपला पक्ष पॉवरफुल आहे. त्यामुळे प्रत्येकाने महाविजय 2024साठी सज्ज रहावे.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, निश्चय आणि कृतीची जोड यशस्वीतेची खात्री देत असते. त्यामुळे प्रत्येकाने तशी वाटचाल केली पाहिजे. मनाशी खूणगाठ बांधून प्रत्येक दिवशी आपली जबाबदारी कर्तव्याने पार पाडण्यासाठी टार्गेट ठेवले पाहिजे. येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत देदीप्यमान यश मिळवायचे आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज रहावे तसेच येत्या 12 ऑक्टोबरला आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पनवेल दौरा असून त्यामध्ये पदाधिकार्‍यांची बैठक, नागरिकांशी संपर्क कार्यक्रम होणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.
या वेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी, पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी उत्तर रायगड जिल्हा यशस्वीपणे पार पाडत असल्याचे अधोरेखित केले. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी म्हटले की, भाजपसारखी रचना अन्य कोणत्याही पक्षात दिसत नाही. मेहनती कार्यकर्ते या पक्षात आहेत आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व संधी तसेच जबाबदारीने काम करणारा हा पक्ष आहे. मी आमदार होण्यामध्ये मंत्री रवींद्र चव्हाण व भाजपच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे, असेही त्यांनी नमूद केले. आमदार निरंजन डावखरे यांनी पदवीधर मतदार नोंदणीसंदर्भात माहिती दिली व मार्गदर्शन केले, तर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त विशद करून आढावा घेतला तसेच जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांना त्या संदर्भातील संघटनात्मक सूचना केल्या.
या वेळी उत्तर रायगड जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकार्‍यांना मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, रामदास ठोंबरे, निळकंठ घरत, विठ्ठल मोरे, प्रिया मुकादम, सुभाष कदम, सनी यादव, चिटणीस चंद्रकांत घरत, ज्ञानेश्वर घरत, रमेश मुंडे, ब्रिजेश पटेल, विद्या तामखडे, किर्ती नवघरे, प्रदीप देशमुख, कोषाध्यक्ष अभिलाषा ठाकूर, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत, खोपोली रमेश रेटरेकर, खालापूर प्रवीण मोरे, उरण रवी भोईर, कामोठे रवींद्र जोशी, कळंबोली रविनाथ पाटील, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष बंडू शिद, फ्रेंडस् ऑफ बीजेपी संयोजक नितीन कांदळगावकर, आध्यात्मिक समन्वय आघाडी संयोजक काशिनाथ पारठे, सोशल मीडिया सेल संयोजक गायत्री परांजपे, आयटी सेल नितेश सोळंकी, भटके विमुक्त आघाडी संयोजक बबन बारगजे, सांस्कृतिक सेल संयोजक अभिषेक पटवर्धन, ट्रान्सपोर्ट सेल संयोजक सुधीर घरत, प्रज्ञा सेल संयोजक गीता चौधरी, आयुष्यमान भारत सेल संयोजक ज्योती देशमाने, बेटी बचाव बेटी पढाव संयोजक आरती तायडे, व्यापार आघाडी संयोजक कमल कोठारी, उत्तर भारतीय सेल संयोजक संतोष शर्मा, एनजीओ संपर्क आघाडीचे मंदार मेहेंदळे, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष के.सी.पाटील, कायदा सेल अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, क्रीडा प्रकोष्ठ संयोजक विनोद नाईक, रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ संयोजक उपेंद्र मराठे, पदवीधर प्रकोष्ठ संयोजक राजेश कदम यांना नियुक्ती प्रदान करण्यात आले. या बैठकीस जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, विविध मोर्चा, सेल व प्रकोष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीला एमआयडीसीकडून जागेचे हस्तांतरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीच्या पुनर्वसनासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न …

Leave a Reply