Breaking News

शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उलवे नोडमध्ये देवीचे पूजन

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार (दि. 15)पासून सुरुवात झाली आहे. उलवे नोड खारकोपर येथे जय बजरंग कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळांच्या वतीनेही नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणच्या देवीचे पूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विधीवत करण्यात आले.
या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वसंतशेठ पाटील, सुधीर ठाकूर, भाऊशेठ भोईर, किशोर पाटील, काशिनाथ पाटील, रामदास पाटील, वैभव घरत, मोरेश्वर पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते.
यंदाचे या नवरात्रोत्सवाचे 19वे वर्ष आहे. येथे गरबा आणि दांडिया स्पर्धेचे तसेच पंचम निर्मित गंध सुरांचा ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना आहे.
दरम्यान, पनवेलसह रायगड जिल्ह्यात परंपरागत पद्धतीने सर्व धार्मिक विधी करून नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. सकाळपासूनच सार्वजनिक मंडळांनी वाजतगाजत मूर्तीची मिरवणूक काढून देवीची स्थापना केली.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply