Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांनी साधला पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत आमदार प्रशांत ठाकूर संवाद साधून निवडणुकीबाबत मार्गदर्शन करत आहेत. त्या अंतर्गत कळंबोली प्रभाग क्रमांक 7, 8, 9, 10मधील सेक्टर आणि बिल्डिंग प्रमुखांची बैठक नुकतीच झाली. या वेळी निवडणुकीत विजयाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीस भाजप गोवा प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार दयानंद सोपटे, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, अमर पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी संघटनशक्ती वाढवून स्थानिक पातळीवरील संपर्क अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला तसेच कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवण्याच्या दिशेने ठोस निर्णय घेण्यात आले.

Check Also

नमो चषकात कबड्डीचा थरार!

पुरुष गटात नवकिरण, तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी उलवे नोड : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ …

Leave a Reply