Breaking News

पनवेलमधील दुंदरे, रिटघर, शिवणसईतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यामध्ये ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली आहे. दुंदरे ग्रामपंचायत हद्दीतील दुंदरेसह रिटघर, शिवणसई येथील शेकाप कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 15) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
भाजप पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील तसेच कृष्णा पाटील, भगवान भोपी, गुलाब भोपी, वासुदेव भोपी, विलास भोपी, गणेश भोपी, भालचंद्र भोपी, नवनाथ भोपी, गुरुनाथ भोपी, बाळा भोपी यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत पनवेल तालुक्यात होत असलेली विकासकामे पाहून विविध पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी होत आहे. अशाच प्रकारे शेकापचे रिटघर येथील बाळकृष्ण भोपी, राम भोपी, दत्ता भोपी, जयदास भोपी, विलास भोपी, अरुण भोपी, संतोष भोपी, अशोक भोपी, दशरथ भोपी, बजरंग भोपी, उमेश भोपी, प्रदीप भोपी, तुषार भोपी, अमित भोपी, हरी भोपी, प्रलय भोपी, अंकुश वाघ, रोहिदास वाघ, जया वाघमारे, प्रल्हाद सवार, अक्षय सवार, निलेश वाघे, गणेश वाघमारे, अंकुश वाघ, कमळा वाघमारे, रमेश सवार, संजय भोपी, स्पप्नील भोपी, प्रथम विष्णू भोपी; दुंदरे येथील रमेश चौधरी, रोहिदास चौधरी, देविदास चौधरी, नंदराज चौधरी, विजेता सिंग, नेत्रा राणे; शिवणसई येथील दुंदरे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बेंडू गोसावी यांच्यासह रवींद्र गोसावी, करण गोसावी, सुगंधा गोसावी, ज्ञानेश्वर गोसावी, रूपाली गोसावी यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या सर्वांचे पक्षाची शाल देऊन भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply