पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री रवींद्र चव्हाण, मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या आदेशानुसार पनवेल शहर मंडल अध्यक्ष अनिल भगत यांनी नुकतीच पनवेल मंडल कार्यकारिणी जाहीर केली होती. यानंतर या कार्यकारिणी अंतर्गत विविध सेलच्या पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पनवेल शहर मंडल कार्यकारिणी अंतर्गत महिला मोर्चा अध्यक्षपदी राजश्री महेंद्र वावेकर, युवा मोर्चा अध्यक्षपदी सुमित उल्हास झुंझारराव, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी रावसाहेब बाबुराव खरात, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी रामनाथ महादेव पाटील, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी निसार सिराज सय्यद, आदिवासी मोर्चा अध्यक्षपदी महेश महादेव वाघे, किसान मोर्चा अध्यक्षपदी रूपेश परदेशी यांची नियुक्ती झाली आहे.
कामगार आघाडीवर मोतीलाल बुधाजी कोळी, जैन प्रकोष्ठ राकेश प्रेमचंद कांटेड, आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ संदीप (गुरूनाथ) लोंढे, सहकार सेल महेंद्र श्रीनिवास गोडबोले, सोशल मीडिया सेल प्रसाद एकनाथ हनुमंते, भटके विमुक्त आघाडी चंद्रकांत शंकर मंजुळे, सांस्कृतिक सेल वैभव किशोर बुवा, ट्रान्सपोर्ट सेल कमलाकर कृष्णा म्हात्रे, आयुष्यमान भारत सेल दिपाली प्रसाद जोशी, बेटी बचाव बेटी पढाव सेल अनिता रणदिवे, व्यापार आघाडी विनोद लक्ष्मीलाल बाफना, मच्छीमार सेल हरिश्चंद्र शंकर भगत, दक्षिण भारतीय सेल के. तारानाथ शेट्टी, वैद्यकीय सेल डॉ. अस्मिता जगदीश घरत, शिक्षक सेल हिरा तुकाराम कोळी, ज्येेष्ठ कार्यकर्ता सेल सचिन देसाई, दिव्यांग सेल शिवाजी निलाप्पा कांबळे, कायदा सेल अॅड. चेतन भास्कर जाधव, रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ भिमराव पोवार, उद्योग आघाडी हर्षल सूचक, पदवीधर प्रकोष्ठ प्रशांत किसन फुलपगार, अभियंता प्रकोष्ठसाठी प्रशांत बीके ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Check Also
खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ’नॅक’ची ए श्रेणी प्राप्त
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर …