Breaking News

कुडावे वडवली येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी आणि मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांतून अनेक विकासकामे होत आहे. याअंतर्गत कुडावे वडवली येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन महेश बालदी यांच्या 20 लाख रुपये आमदार निधीतून करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन नांदगाव सरपंच विजेता भोईर यांच्या हस्ते रविवारी (दि. 29) करण्यात आले. या वेळी कुडावे वडवली येथील रस्त्याच्या कामासाठी भरघोस निधी मंजूर करून दिल्या बद्दल ग्रामस्थांनी उरणचे आमदार महेश बालदी यांचे आभार मानले. उरण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे दमदार आमदार महेश बालदी यांच्या प्रयतकतून कुडावे वडवली येथील रस्त्याच्या कामासाठी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन नांदगाव सरपंच विजेता भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच अर्चना पाटील, कुडावे भाजप अध्यक्ष विनायक पाटील, उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, विजय गवंडी, मनोहर भोईर, अविनाश उद्धार, अशोक कोंडीलकर, सखाराम ठाकूर, दत्तात्रेय हातमोडे, शरद वांगिलकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीला एमआयडीसीकडून जागेचे हस्तांतरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीच्या पुनर्वसनासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न …

Leave a Reply