Breaking News

उरण एसटी आगारात नवीन पाच बस दाखल

आमदार महेश बालदी यांची उपस्थिती

उरण : रामप्रहर वृत्त
सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने येथील एसटी आगारात नवीन पाच बसगाड्या दाखल झाल्या आहेत. या बसगाड्यांचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.14) झाले.
या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते रवी भोईर, शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, माजी शहराध्यक्ष कौशिक शाह, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, युवा मोर्चा शहराध्यक्ष निलेश पाटील, तालुका सरचिटणीस कैलास भोईर, उपाध्यक्ष सुनील पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, डेपो मॅनेजर गीता कोंडार यांच्यासह चालक, वाहक, प्रवासी उपस्थित होते. या वेळी आमदार महेश बालदी व इतर मान्यवरांनी नवीन एसटी बसमधून प्रवास केला.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply