नागोठणे : प्रतिनिधी – नागोठणे येथील सुभाष ओटरमल जैन यांनी कोरोनाच्या लढाईत आपल्या प्राणाची बाजी लावून काम करणारी पोलीस यंत्रणा तसेच आरोग्य पथक आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांना फेस शिल्डचे वाटप करून आपली कृतज्ञता व्यक्त केली.
जैन यांनी साहित्याचा संच पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जावून संबंधितांना प्रदान केला.