Breaking News

कर्जत तालुक्यातील दोन ग्रामपंचायतच्या 8 डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूका

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील वरई आणि तिवरे या दोन ग्रुप ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 8 डिसेंबर रोजी होत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच होत असलेल्या या दोन ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व मिळविण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे.

कर्जत तालुक्यातील तिवरे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच पद  अनुसूचित जमातीतील महिलेसाठी राखीव असून तेथे थेट सरपंच आणि नऊ सदस्य यांच्यासाठी निवडणूक होणार आहे.  तर वरई ग्रुपग्रामपंचायतीचे थेट सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून तेथे नऊ सदस्यांसाठीदेखील निवडणुक होत आहे.

या दोन्ही ग्रामपंचायतीचे थेट सरपंच आणि सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 21 नोव्हेंबरपर्यन्त असून, त्यांची छाननी 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे. नामांकन अर्ज 25 नोव्हेंबर रोजी दुपारी तीनपर्यन्त मागे घेता येणार आहेत. तर 8 डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार असून 9 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तिवरे ग्रामपंचायतीकरिता निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून महेशकुमार घोरपुडे तर वरई ग्रामपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. डी. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply