Wednesday , February 8 2023
Breaking News

प्रभाग 18मध्ये साफसफाई

नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता

पनवेल : वार्ताहर

प्रभागातील विकास कामांच्या बरोबर, प्रभागातील समस्यांचे निरसन करणे आणि प्रभाग स्वच्छ कसा राहील याकडे नेहमीच नगरसेवक विक्रांत पाटील यांचे जातीने लक्ष असते. नुकताच प्रभागात साचलेला कचरा त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून तत्काळ उचला व साफसफाई करून घेतली.

प्रभागात ठाणा नाका रोड आणि टिळक रोड इथे कचरा उचला गेलेला नाही, अशी माहिती प्रभागातील काही दक्ष नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना दिली.नागरिकांच्या आरोग्य विषय लक्षात घेता त्यांनी त्वरित महानगरपालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्वरित कचरा उचलण्यास सांगितले. महापालिकेच्या स्वच्छता विभागाने त्वरित कचरा उचलून साफ सफाई करून घेतली. माझा प्रभाग, माझी जबाबदारी या अनुषंगाने नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच काम करत आले आहेत. या बद्दल प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply