Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून कानपोली येथे महिला ग्रामसंघाचे कार्यालय

मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकामांसह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यानुसार त्यांनी तालुक्यातील कानपोली येथे महिला सक्षमीकरणासाठी स्वखर्चातून झाशीची राणी महिला ग्रामसंघाचे कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि.28) झाले.
या ग्रामसंघामध्ये 14 बचत गट मिळून 140 महिलांचा समावेश आहे. ग्रामसंघ कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास भाजपच्या जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, एकनाथ देशेकर, प्रकाश खैरे, खेरणेचे सरपंच शैलेश माळी उपसरपंच राजेंद्र गोंधळी, दीपक उलवेकर, अशोक साळुंखे, राजेश पाटील, चंद्रकांत पाटील, संध्या शारबिद्रे, माजी नगरसेविका अ‍ॅड.वृषाली वाघमारे, माजी सरपंच कमला देशेकर, बाळकृष्ण पाटील, निवृत्ती पाटील, बाबुराव पाटील, प्रदीप मधे, उमेश पाटील, दिनेश पाटील अक्षय पाटील, काशिनाथ पाटील, संजय पवार, रमेश मते, शोभा मते, राणी पाटील, पूनम पाटील, मंजुळा पाटील, कविता मते, बामा उघडा, नंदा पारधी, शनिवार गिरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या वेळी बोलताना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी महिला सक्षमीकरणासाठी तसेच त्यांना नवनवीन उद्योग उपलब्ध करून देण्यासाठी भाजप तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही दिली.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply