Breaking News

रसायनीतील वीटभट्टी व्यावसायिक आशावादी

रसायनी : प्रतिनिधी

वीटभट्टीचा व्यवसाय जोखमीचा असून मातीत पैसे टाकून मातीतूनच पुन्हा पैसे निर्माण करण्याचा हा धंदा आहे. रसायनीत सध्या विटांना हवी तशी मागणी नसल्याने लाखो रुपयांच्या विटा काही ठिकाणी पडून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या हंगामात विटांची जोरात विक्री सुरू होईल, असा आशावाद समोर ठेवून वीटभट्टी व्यावसायिकांनी विटांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली, परंतु काही ठिकाणी कामाला सिमेंटच्या विटांचा वापर होत असल्याने मातीच्या विटांची मागणी घटल्याचे वीटभट्टी व्यावसायिक सांगत आहेत.

सध्या सुरू असलेली आर्थिंक मंदी, त्यातच बांधकाम व्यवसायावर आलेले मंदीचे सावट, रेती उत्खननावर असलेली बंदी, कामगारांची कमतरता यामुळे वीट व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. वीट व्यवसायाला लागणारा कच्चा माल म्हणजे माती. ही माती उत्खनन करण्यासाठी शासनाला रॉयल्टी भरावी लागत आहे. त्याचप्रमाणे वीट बनविण्यासाठी लागणारे तूस, कोळसा आदी गोष्टींचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. वीट उत्पादन करणार्‍या स्थानिक मजुरांची कमतरता असल्याने जास्त मजुरी देऊन कर्नाटक व गुजरात राज्यातून मजूर आणावे लागत आहेत. आता बांधकामासाठी पर्यायी सिमेंटच्या विटांचा सर्रास वापर होत असल्याने या विटांची मागणी आता घटली आहे. यामुळे वीट व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply