Breaking News

नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करा

कर्जत शहर भाजपचे पोलिसांना निवेदन

कर्जत : बातमीदार

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले होते. त्या अपशब्दांबद्दल नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कर्जत शहर भाजपच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन देऊन करण्यात आली.

नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी करणारे निवेदन कर्जत पोलीस स्टेशन येथे भाजपच्या वतीने कर्जत पोलिसांना देण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वक्तव्य करणार्‍या नाना पटोले यांना ताबडतोब अटक करा. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन या वेळी देण्यात आले. या वेळी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे, तालुका सरचिटणीस संजय कराळे, कर्जत शहराध्यक्ष बळवंत घुमरे, शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, महिला तालुकाध्यक्ष स्नेहा गोगटे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मिनेश मसने, युवा शहराध्यक्ष मयूरेश शितोळे, उपाध्यक्ष सार्थक घरलुटे, चिटणीस सर्वेश गोगटे, सोशल मीडियाच्या कोकण संयोजक गायत्री परांजपे, शहर उपाध्यक्ष शर्वरी कांबळे, सांस्कृतिक सेलचे विजय कुलकर्णी, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply