Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाण येथील स्मशानभूमीचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी 2515च्या माध्यमातून गव्हाण येथे उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि.18) करण्यात आले.
उरण विधानसभा मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे अनेक कामे मार्गी लागत आहे. त्यानुसार गव्हाण येथे स्मशानभूमीचे काम पूर्णत्वास आले आहे. गेली दहा-पंधरा वर्षे या स्मशानभूमीचे काम रखडले होते. आमदार महेश बालदी यांनी या संदर्भात पाठपुरावा केला आणि त्यांच्या माध्यमातून ही स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. आता ही नव्याने उभारण्यात आलेली स्मशानभूमी पुढची पन्नास वर्षे टिकून राहील असे काम झाले आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधांसाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि आम्ही सर्व जण आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी केले. पुढे बोलताना त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन जागरूक राहिल्यास आपल्या परिसराचा योग्य असा विकास करता येईल, असे अधोरेखित केले.
या कार्यक्रमास माजी पं.स. सदस्य भाऊशेठ पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, भाजप तालुका चिटणीस जयवंत देशमुख, कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कोळी, वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष हेमंत ठाकूर, कामगार नेते मोतीलाल कोळी, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी तसेच महादेव कोळी, अशोक कडू, श्रीकांत देशमुख, सुहास भगत, सुनील कोळी, मच्छीमार सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत कोळी, स्नेहलता ठाकूर, परशुराम वास्कर, सुरेश वास्कर, राजकिरण कोळी, आकाश कोळी, दीपक देशमुख, प्रमोद देशमुख, बाळकृष्ण कोळी, रामनाथ तांडेल, महेंद्र पाटील, सोमनाथ भगत, रवींद्र ठाकूर, अनिकेत कोळी, विनायक कोळी, के.डी. कोळी, विदुला इन्टरप्राईजेसचे प्रोप्रायटर मयूर ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply