पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुकयातील भाताण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत उपसरपंचपदी भाजपचे अरुण पाटील यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. तरुण आणि होतकरू असलेले अरुण पाटील हे उपसरपंच पदाला न्याय देतील आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास काम त्यांच्या उपसरपंच पदाच्या कालावधीत ते करतील, असे मत पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायतीच्या कार्यलयात झालेल्या निवडणुकीदरम्यान तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, माजी सभापती वसंत काठावले, भाताण ग्रामंपचायतीचे सरपंच तानाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य दीपक ठाकूर, रसिका भोईर, रजनी मुकादम, अस्मिता काठावले, अरुणा गाताडे, माजी उपसरपंच बाळाराम मुकादम, सावळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील माळी,अविनाश गाताडे, प्रवीण खंडागळे, माजी सभापती देविदास पाटील, सुभाष भोईर, उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा चिटणीस प्रिया मुकादम यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …