Breaking News

उरण मतदारसंघात विकास कामांची गंगा

भाताण गावात 10 कोटींची विकासकामे
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुकयातील भाताण ग्रामपंचायतीमध्ये उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून तब्ब्ल 10 कोटीची विकास कामे होणार असून यामुळे भाताण ग्रामपंचायतीचा कायापालट होणार एवढ्या मोठ्या प्रमाणात या ग्रामपंचायतीच्या हद्दीत विकास कामे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन बुधवारी (दि. 20)पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये अजिवली हायस्कुल ते भाताण पाडा रस्त्यासाठी 7 कोटी 50 लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तर भाताण डीपीसी मधून भाताण पाडा येथे 15 लाख रुपयांचा निधी स्मशानभूमीसाठी, भाताण येथे तलाव संरक्षण भिंतीसाठी दोन लाख 89 हजार रुपयांचा निधी, कैलास पाटील यांच्या घरापासून ते साईमंदिरा पर्यंत आरसीसी गटारासाठी 10 लाख रुपयांचा निधी, ग्रामपंचायत कार्यालया पासून ते किशोर भोईर यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 10 लाख रुपयांचा निधी तसेच कैलास पाटील यांच्या घरापासून साईमंदिर पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 10 लाख रुपयांचा निधी, ग्रामपंचायत कार्यलय ते किशोर भोईर यांच्या आरसीसी गटारासाठी 10 लाख रुपयांचा निधी, भाताण तलाव येथे मंगल कार्यालयासाठी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने बस स्टॅन्ड ची उभारणी करण्यात येणार आहे. भूमिपूजनावेळी प्रवीण खंडागळे, अविनाश गाताडे, बबन मुकादम, हरेश केणी, अनंता सते, अनिल भोईर, गुरूनाथ खारके, सावळे सरपंच सुनील माळी, जगन्नाथ चव्हाण, पंचायत समिती माजी सभापती देविदास पाटील, प्रिया मुकादम, पंचायत समिती उपसभापती वंसत काठावले, शाम ठोबंरे, रवि देसाई, गणेश अगिवले, संतोष पाटील, अरुण म्हसकर, नारपोली सरपंच दीपक पाटील , दीपक दुर्गे, महादू पाटील, तानाजी पाटील, बाळाराम मुकादम, रंजनी मुकादम,अरुणा गाताडे, रसिका भोईर, दीपक ठाकुर, उपसरपंच अरुण पाटील, अस्मिता काठावले, दत्तात्रेय ठाकुर, सुभाष भोईर, कमलाकर जुमारे, कृष्णा भोईर, अनंता काठावले, हरिशचंद्र जुमारे, नितीन पाटील, तुकाराम मुकादम, महेश घरत, मधुकर मुकादम, सतोंष पाटील, संजय काठावले, स्वप्नील भोइर, किरण मुकादम, गणेश गाताडे, अनिल काठावले, विजय ठाकुर, नितेश भोईर, देवीदास पाटील, दीनकर पाटील, अशोक भोईर, एकनाथ ठाकुर, भरत ठाकुर, राम ठाकुर, शांताराम पाटील, वामन पाटील, कृष्णा खारके, राम भोईर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply