
चौक : प्रतिनिधी
सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर, चौक शाळेत जागतिक मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत बिर्ला कार्बन कंपनी प्रा.लि.पाताळगंगा यांच्या सौजन्याने सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत कंपनीचे प्रतिनिधी मानव संसाधन विभाग प्रमुख प्रकाश देसाई व समाज विकास अधिकारी लक्ष्मण मोरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पिण्यास शुद्ध पाणी मिळावे या हेतूने आर. ओ. वॉटर सिस्टीम मशीन व सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचा उद्घाटन समारंभ नायब तहसीलदार कल्याणी कदम व पुजारी यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी विद्या प्रसारिनी सभा, चौक संस्थेच्या कार्याध्यक्ष शोभाताई देशमुख, उपाध्यक्ष तात्यासाहेब कापरेकर, माजी कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक अॅड. अविनाश देशमुख, मुख्याध्यापिका देवळे, मुख्याध्यापक भोमले, मंडळ अधिकारी नितीन परदेशी, फडतरे, तलाठी संतोष जांभळे, के. वाय. राठोड, आदिवासी समाज नेते डी. डी. डाके, पत्रकार अर्जुन कदम, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर प्रसंगी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बडेकर सर यांनी केले. तसेच याच दिवशी आदिवासी दांडवाडी येथे समाजमंदिर व प्रत्येक कुटुंबासाठी स्वतंत्र 65 स्वच्छतागृहांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा नायब तहसीलदार यांच्या हस्ते संपन्न झाला.
व्यासपीठावर प्रोडक्शन हेड रवींद्र रघुवंशी, इंजिनिअरिंग हेड पवन झा, ग्रुप ग्रामपंचायत वडगाव सरपंच गौरी गडगे, उपसरपंच पाटील, महादेव गडगे, संदेश मालकर, अनेक सदस्य, सचिन कंदले, संदीप पाटील, प्रमोद मालकर व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.