Breaking News

पिस्तुल विक्रीसाठी आलेल्याला कर्जतमध्ये अटक

अलिबाग : प्रतिनिधी
पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) कर्जत येथून अटक केली. त्याच्याकडून देशी बनवाटीची दोन पिस्तुल व पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. सतिश अनिल क्षेत्रे (वय 29, रा. उलवे, मूळ चेंबूर टिळकनगर, मुंबई) असे या आरोपीचे नाव आहे.
एक व्यक्ती कर्जत चारफाटा येथे देशी पिस्तुल विक्री करण्याकरिता येणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार राजा पाटील यांना मिळाली होती. त्यांनी याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली. त्यानुसार एक पथक तयार करून कर्जत चारफाटा परिसरात सापळा रचण्यात आला. सतिश क्षेत्रे तेथे आला असता या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ दोन देशी पिस्तुल व पाच जिवंत काडतूस मिळून आली.
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी सतिश क्षेत्रे याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम 1959चे कलम 25,3, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 135,37(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम व पथक अधिक तपास करीत आहे.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply