Breaking News

देशाच्या संविधानिकपदाचा अपमान करणार्‍या विरोधी पक्षांचा पनवेलमध्ये तीव्र निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त
उपराष्ट्रपती या संवैधानिकपदाचा अवमान करणारी इंडिया आघाडी आणि या आघाडीतील पक्षांविरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून पनवेलमध्ये भाजपच्या वतीने मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.21) निषेध आंदोलन करण्यात आले. उपराष्ट्रपतींचा अवमान सहन करणार नाही, इंडिया आघाडीने देशाची माफी मागावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
संसद भवनाच्या पायर्‍यांवर विरोधी खासदारांच्या निदर्शनादरम्यान कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली. या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हसून व्हिडीओ बनवत होते. अशा प्रकारे उपराष्ट्रपतींचा अपमान करणारी इंडिया आघाडी आणि त्यात सामिल असलेले काँग्रेस, उबाठा, शरद पवार गटाविरोधात पनवेल भाजपतर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयाजवळ निषेध आंदोलन करण्यात आले.
देशाच्या संवैधानिकपदाचा अपमान करणे ही काँग्रेससह इंडिया आघाडीची संस्कृती बनली आहे, अशी टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केली. ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान म्हणून पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचा
आम्हाला अभिमान आहे. सर्वसामान्य जनतेला मोदीजी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, जनतेला काय पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. दुसरीकडे विरोधी पक्ष देशाच्या विकासासाठी नाही, तर सत्तेसाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनतेला सेवा देण्याची प्रेरणा मोदीजींमध्ये आहे आणि ती सर्वांनी शिकण्यासारखी आहे. म्हणून आम्ही त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवतो. देशाचे पंतप्रधान म्हणून मोदीजी देशातील जनतेला आपलेसे वाटतात. त्यामुळे जितका त्यांचा द्वेष करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करेल तितक्याच प्रमाणात सर्वसामान्य जनता पेटून उठून मोदीजींना उचलून धरेल हा पूर्वीचा अनुभव आहे आणि हाच अनुभव पुढेही येत राहील.
या निषेध आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, भाजपच्या
दक्षिण भारतीय आघाडीचे सहसंयोजक रमेश नायर, कोकण विभागाचे संयोजक गणेश शेट्टी, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, भाजप पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, विकास घरत, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष
सुमित झुंझारराव, हर्षवर्धन पाटील, उत्तर भारतीय प्रकोष्ठचे संयोजक संतोष शर्मा, शहर खजिनदार संजय जैन, अभिषेक भोपी, युवा नेते सतिश पाटील, केदार भगत, विनोद वाघमारे, प्रितम म्हात्रे, रूपेश नागवेकर, विश्वजीत पाटील,
सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply