उरण : रामप्रहर वृत्त
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने परकीय चलन विनीमय व्यापारफ या विषयावर पुणे येथील नॉलेज ट्रेड अकॅडमी यांच्या सहकार्याने महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित केली होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम एन. गायकवाड यांच्या मागदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत सुशांत शिवदास यांनी ईक्वीटी मार्केट, कमोडीटी मार्केट, फोरेक्स मार्केट आदी विषयी माहिती सांगून फॉरेक्स मार्केट म्हणजे काय? ते कशा पद्धतीने चालते व त्यात आपण कशी गुंतवणूक करावी याविषयी सविस्तर मागदर्शन केले. या वेळी आशिष कांबळे यांनी, विद्यार्थ्यांनी अपडेटबरोबर अपग्रेड राहिले पाहिजे, तसेच आत्मविश्वासाने डिजीटल मार्केटमध्ये उतरले पाहिजे असे सांगितले.
प्रशिक्षक कांचन मॅडम यांनी विदयार्थ्यांना उत्साही जगण्याचा मार्ग सांगितला. कार्यशाळेसाठी नॉलेज ट्रेड अकॅडमीचे संचालक राजकुमार कांबळे, ज्येष्ठ प्रा. व्हि. एस. इंदुलकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एच. के. जगताप यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय प्रा.डॉ. ए. आर. चव्हाण यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी व्यक्त केले.