Breaking News

खोपोलीतील लेखिका डॉ.सादिका नवाब यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

खोपोली : प्रतिनिधी
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या स्वायत्त संस्थेतर्फे 24 भारतीय भाषांसाठी दिल्या जाणार्‍या पुरस्कारात खोपोलीतील ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सादिका नवाब (सहर) यांच्या राजदेव की अमराई या उर्दू भाषेतील कादंबरीला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
कुरतुल ऐन हैदर यांच्यानंतर 56 वर्षांनी उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणार्‍या डॉ. सादिका नवाब या दुसर्‍या महिला लेखिका आहेत. साहित्य आणि भाषा क्षेत्रातील असाधारण योगदानासाठी प्रतिष्ठेचा साहित्य अकादमीचा पुरस्कार दिला जातो. रोख एक लाख रुपये, ताम्रपट, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप असून 12 मार्च 2024 रोजी हा पुरस्कार त्यांना सन्मानाने दिल्ली येथे प्रदान करण्यात येईल.
आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथे जन्मलेल्या डॉ. सादिका नवाब मुंबईत वाढल्या. त्यांनी एमए (उर्दू), एमए (इंग्रजी), एमए (हिंदी) या विषयांत पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतल्यानंतर ‘गझल शिल्प और संवेदना विशेष संदर्भ- दुष्यंत कुमार’ या विषयावर मुंबई विद्यापीठातून पीएचडीचे संशोधन पूर्ण केले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केएमसी महाविद्यालयातून हिंदी विभाग प्रमुख म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. हिंदी विषयात त्यांनी पीएचडीच्या संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply