Breaking News

पनवेलमध्ये अक्षता कलश यात्रा उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त
नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून अक्षता कलश यात्रेचे आयोजन रविवारी (दि.31) पनवेलमध्ये करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कलश यात्रेत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर सहभागी झाले होते. प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर अयोध्येत साकारत आहे. या मंदिरात 22 जानेवारी रोजी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी घरोघरी रामभक्त फिरणार आहेत. त्याकरिता अयोध्येतून आलेल्या अक्षतांच्या कलशाची पनवेलमध्ये मिरवणूक काढण्यात आली. या यात्रेची सुरुवात कोळीवाड्यामतील जरीमरी मंदिर येथून उत्साहपूर्ण वातावरणात झाली. या वेळी वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यासोबतच जय श्रीराम अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. या यात्रेत भाजपचे पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक राजू सोनी, मदन कोळी, प्रकाश बिनेदार, विक्रांत पाटील, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, रूचिता लोंढे, नीता माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, कोळी समाज अध्यक्ष हरिश्चंद्र भगत, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा मिडलक्लास हौसिंग सोसायटी मंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव, युवा नेते केदार भगत, अमित ओझे, भटके विमुक्त आघाडीचे संयोजक चंद्रकांत मंजुळे, रूपेश नायगावकर, प्रीतम म्हात्रे, स्वाती कोळी, कोमल कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे नियोजन अमित ओझे व केदार भगत यांनी केले. वाल्मिकी नगर येथे यात्रेची समाप्ती करण्यात आली.

Check Also

कामोठे कॉलनी फोरमचे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या सर्वांगीण विकासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षात सहभागी होण्याचा ओघ …

Leave a Reply