Breaking News

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते जिमचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलजवळील विचुंबे येथे महेश भिंगारकर यांनी नव्याने एम.बी.फिटनेस ही जिम सुरू केली आहे. या जिमचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.31) करण्यात आले.
उद्घाटन समारंभास विचुंबेचे सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच स्वाती पाटील, माजी सरपंच बळीराम पाटील, अमिता म्हात्रे, माजी उपसरपंच किशोर सुरते, रवींद्र भोईर, अप्पा गायकवाड, डी.के.भोईर, अनिल भोईर, बाबुराव भिंगारकर, प्रेम भिंगारकर, भरत पाटील, अक्षता गायकवाड, विभुती सुरते, नविता भोईर, प्रगती गोंधळी, श्रावणी भोईर, भाग्यश्री भोईर, भावना भोईर, संजिता भिंगारकर, ज्योती भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी, महेश पाटील यांच्या फिटनेसबाबतच्या ज्ञानामुळे तरुणांना चांगल्या प्रकारची शिस्त आणि शारीरिक कसरतीची आवड निर्माण होईल, असे गौरोद्गार काढून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply