Breaking News

कर्जत-माथेरान मिनीबस पुन्हा सुरू

भाजपच्या मागणीला यश

कर्जत ः बातमीदार
यंदा कोविड काळात लॉकडाऊन लागल्यानंतर बंद करण्यात आलेली कर्जत-माथेरान मिनीबस सेवा तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू करण्याचा निर्णय कर्जत एसटी आगाराने घेतला आहे. यासाठी स्थानिकांची अडचण लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने मागणी केली होती. त्यानुसार सोमवार (दि. 21)पासून ही बससेवा सुरू झाली आहे.
माथेरानमधील सर्वसामान्य जनतेकडे वाहन नसल्याने स्थानिकांना मिनीबसचा मोठा आधार होता. कोणत्याही कामासाठी व विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मिनीबस माथेरानकरांची जीवनवाहिनी बनली होती. कमी पैशात सुरक्षित प्रवासामुळे मिनीबसला माथेरानकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत होता, मात्र कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे माथेरानमध्येही लॉकडाऊन लागू झाले. पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली. परिणामी प्रवासी संख्या घटल्याने एसटी प्रशासनाने ही सेवा बंद केली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मिनीबस लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात भाजपकडून निवेदन देण्यात आले होते. याचा सकारात्मक विचार करीत अखेर एसटी महामंडळाच्या कर्जत आगाराने सोमपासून मिनीबस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसातून तीन फेर्‍या कर्जतहून, तर तीन फेर्‍या माथेरानहून असणार आहेत. मिनीबस सुरू होत असल्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मिनीबसचे वेळापत्रक

  • कर्जतहून सकाळी 8.15, दुपारी 12 व सायंकाळी 4.45 वाजता
  • माथेरानहून सकाळी 9.30, दुपारी 1 व सायंकाळी 6 वाजता

मिनीबस सुरू करण्यासंदर्भात माथेरानकरांनी निवेदने दिली होती.त्यानुसार आम्ही सध्या तीन तीन फेर्‍यांमध्ये ही सेवा लोकांना देत आहोत, मात्र या सेवेचा लाभ उठवताना कोविडच्या नियमांचे पालन करावे. मास्कशिवाय बसमध्ये परवानगी मिळणार नाही.
-शंकर यादव, व्यवस्थापक, कर्जत एसटी आगार

मिनीबस सेवा आजपासून सुरू झाली आहे, पण तिच्या फेर्‍या वाढल्या पाहिजेत आणि शनिवार रविवारीदेखील मिनीबस सुरू राहिली पाहिजे.
-आकाश चौधरी, उपनगराध्यक्ष, माथेरान

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply