Breaking News

ऑल इंडिया वॉटर पोलो स्पर्धेत रिलायन्स नागोठणे क्लबचे घवघवीत यश

पाली-बेणसे : प्रतिनिधी

स्पिरीटो ठाणे क्लब ऑल इंडिया वॉटरपोलो स्पर्धा दि. 18 मे ते 21 मे 2019 या कालावधीत ठाणे येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. दोन ग्रुपमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत रिलायन्स नागोठणे क्लबने चमकदार कामगिरी करीत द्वितीय क्रमांक पटकाविला. ग्रुप ए मध्ये एअर फोर्स, आर्मी ग्रीन, ठाणे डेक्कन, पोलीस व ग्रुप बी मध्ये इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी रेड, रिलायन्स क्लब (रायगड), पी. एम. हिंदू बाथ या दोन ग्रुपमध्ये खेळवण्यात आल्या. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण करीत रिलायन्स नागोठणे क्लब (रायगड) यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. रिलायन्स क्लब नागोठणे या टीमचा कर्णधार अक्षयकुमार कुंडे, उपकर्णधार निखिल शिंदे, श्रेयश वैद्य, सारंग वैद्य, अश्विनीकुमार कुंडे, भूषण पाटील, भूषण शिर्के, मंदार भोईर, राज पाटील, वेदांत कुथे, श्रुतिक शिर्के या सर्व खेळाडूंनी आपले कसब पणाला लावून अप्रतीम क्रीडाकौशल्याचे सादरीकरण केले व द्वितीय क्रमांकावर आपली मोहर उमटवली. विजेत्या संघाला यशाच्या शिखरापर्यंत पोहचविण्यात आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक दत्ताराम तरे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व योगदान लाभले. रिलायन्स क्लब नागोठणेच्या यशस्वी खेळाडूंचे रिलायन्स नागोठणे आरआयएलएनएमडी प्रकल्पाचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, उपाध्यक्ष चेतन वाळंज, विनय किर्लोस्कर, उदय दिवेकर, इस्टेट मॅनेजर अजिंक्य पाटील आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply