Breaking News

आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरणार : दीपा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

रविवारपासून सुरू होणार्‍या कलात्मक जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत 2020मध्ये टोक्यो येथे होणार्‍या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे ध्येय भारताची अव्वल जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्मकारने डोळ्यांसमोर ठेवले आहे.

 बाकू येथे 17 ते 19 मार्चदरम्यान विश्वचषक स्पर्धा रंगणार असून नोव्हेंबर, 2018 मध्ये जर्मनी येथे झालेल्या विश्वचषकात कांस्यपदक मिळवून दीपाने ऑलिम्पिक प्रवेशासाठी आपली दावेदारी प्रबळ केली आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत पुनरागमन करणार्‍या दीपासाठी ही पहिलीच मुख्य स्पर्धा असून याकरता तिने मेलबर्नमध्ये 21 ते 24 फेब्रुवारीदरम्यान झालेल्या विश्वचषकातून माघार घेतली होती.

यंदा ऑलिम्पिकसाठी वर्षभरात होणार्‍या सर्व विश्वचषकातील कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत मला सर्वोत्तम खेळ करायचा आहे, असे दीपाने सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply