Breaking News

मोहो येथे आमदार निधीतून विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने आणि ग्रुप ग्रामपंचायत वांगणी तर्फे वाजे माजी उपसरपंच अक्षता म्हात्रे यांच्या प्रयत्नाने मोहोगाव येथे आमदार निधी अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 10) करण्यात आले. या कामासाठी 18 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे पूर्ण होते आहे. याअंतर्गत मोहोगाव येथे मोहोगावा अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे आणि मोहो गावातील स्मशानभूमी रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे हि कामे मंजूर करण्यात आली असून या कामाचे भूमिपूजन तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवकर सरपंच आनंद ढवळे, सुकापूर सरपंच राजेश पाटील, सरपंच अशोक पवार, उपसरपंच अरुण जले, जिल्हा परिषद माजी सदस्य तथा तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी सदस्य अमित जाधव, माजी उपसरपंच प्रमोद म्हात्रे, रामदास पाटील, चाहू म्हात्रे, संतोष शेळके, अनंता पाटील, गुरुनाथ भोईर, संतोष पाटील, हभप लक्ष्मण महाराज, हभप पुंडलिक पाटील, हभप गणेश म्हसकर, चेतन मोरे, कविता म्हसकर, सरिता पाटील, विठाबाई पाटील, मिथुन पाटील, सुभाष पाटील, मिलिन म्हसकर, भास्कर पाटील, गणेश पाटील, राहुल पाठे, अंकित म्हात्रे, सागर पाठे, रवी पाठे, अशोक म्हात्रे, जयेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply