Breaking News

अभिनव युवक मित्र मंडळातर्फे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहरातील सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या अभिनव युवक मित्र मंडळातर्फे सालाबादप्रमाणे आजही पनवेल शहरातील श्री दत्त मंदिर, तालुका पोलीस स्टेशन येथे मंडळातील सभासदांनी व महिला वर्गाने त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. यानिमित्ताने मंडळातील सभासद, महिला सभासद यांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळेस शेकडो दीप लावले व संपूर्ण मंदिर परिसर तेजाने उजळून निघाला. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविकांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा केला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply