मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि.9) उत्साहात झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महाविद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कला, क्रीडा, वक्तृत्व आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
धरोहर आमची संस्कृती, आमची सभ्यता या शीर्षकाखाली हे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनास ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, रायगड विभागीय निरीक्षक रोहिदास ठाकूर, शहाजी फडतरे, भाजप ओबोसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, माजी नगरसेवक डॉ.अरुणकुमार भगत, विकास घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, कुसुम म्हात्रे, भाजप शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी पं.स. माजी सदस्य रत्नप्रभा घरत, वर्षा ठाकूर, शालेय समिती सदस्य आशा भगत, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, संजय म्हात्रे, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, समन्वयक सारिका लांजुडकर, नेहा खन्ना, कुसुम प्रजापती आदी उपस्थित होते.
या वेळी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवर आणि पालकवर्गाला खिळवून ठेवणारे व मंत्रमुग्ध करणारे वैविध्यपूर्ण आविष्कारांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.