Breaking News

भूमिपुत्र भवनाला लोकनेते स्व. दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव द्या

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
उलवे नोडमध्ये उभारण्यात आलेल्या भूमिपूत्र भवनाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विषय सादर केला जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी आश्वासित केले.
प्रकल्पग्रस्तांचा बुलंद आवाज लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांनी आपले सर्व जीवन भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या कल्याणाकरिता खर्ची केले आहे. आज त्यांच्यामुळे भूमिपुत्र ताठ मानेने जगत आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून उलवे येथे सिडकोतर्फे बांधण्यात आलेल्या भूमिपुत्र भवनाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे आणि हे भूमिपुत्र भवन ’लोकनेते स्व. दि. बा. पाटील भूमिपुत्र भवन’ या नावाने ओळखले जावे, जेणेकरून भूमिपुत्र भवन व लोकभावनेचा गौरव होईल, असे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी या मागणीच्या अनुषंगाने अधोरेखित केले आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply