पेण : प्रतिनिधी गोवा आरपुरा येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पेण येथील युनायटेड शोतोकान असोसिएशनच्या कराटेपटूने यश मिळविले आहे. यात शिहान रवींद्र म्हात्रे (पप्पु सर) यांच्याकडे कराटेचे प्रशिक्षण घेत असलेल्या रितुल रवींद्र म्हात्रे (2 गोल्ड मेडल), आयुश भरत साळवी (2 गोल्ड मेडल), संस्कार सतीश यादव (2 गोल्ड मेडल), रविना रवींद्र म्हात्रे (1 गोल्ड मेडल 1 ब्राँझ मेडल), विवेक भास्कर पाटील (1 गोल्ड मेडल 1 ब्रॉझ मेडल), आर्यन सुरेश जैन (2 सिल्व्हर मेडल), पूर्वा दिगंबर पाटील (1 गोल्ड मेडल), देवेश संतोष भोईर (1 गोल्ड मेडल), रोहनप्रीत गजनसिंग लेहेल (1 गोल्ड मेडल) शिवम विनोद पाटील (1 ब्राँझ मेडल)ने सन्मानित झाले आहेत. सर्व विद्यार्थी युनायटेड शोतोकान असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा येथे राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी गेले होते, तसेच शिहान रवींद्र म्हात्रे, सेन्साय विनीत साठे, सेन्साय कल्याण रॉय चौधरी, सेन्साय सागर कोळी, सेन्साय निलेश भोसले, सेन्साय पीयूष सदावर्ते, सेन्साय प्रशांत घांगुर्डे या सर्वांचे विद्यार्थ्यांना सहकार्य लाभले होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …